पालघर- जिल्ह्यात आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेल विक्री मनाईसंबंधी पेट्रोलपंप चालकांना आदेश देण्यात आले असून आज सकाळपासूनच आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
आता खाजगी वाहनांसाठी नाही मिळणार पेट्रोल-डिझेल, संचारबंदीच्या उल्लंघनामुळे निर्णय
पेट्रोल आणि डिझेल विक्री मनाईसंबंधी पेट्रोलपंप चालकांना आदेश देण्यात आले असून आज सकाळपासूनच आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही अनेक नागरिक आपली वाहने घेऊन अनावश्यक रस्त्यांवर फिरतात.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही अनेक नागरिक आपली वाहने घेऊन अनावश्यक रस्त्यांवर फिरतात. तसेच पेट्रोल पंपवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी गर्दी होत असते. नागरिकांकडून कायद्याचे आणि नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता, खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाईचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.