पालघर/वसई -वसई विरारमध्ये लहान मुलांना विकण्याची टोळी सक्रिय असून, अडीच लाखात एका आठ महिन्यांच्या मुलीला विकण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. याप्रकरणी बाळांची विक्री करणाऱ्या चार जणांच्या टोळीला विरार पोलिसांकडून रंगेहाथ पकडून अटक केली आहे. यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
अडीच लाखात आठ महिन्यांच्या मुलीची विक्री; पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ विकण्याचा डाव फसला - वसई पोलीस स्टेशन
वसई विरारमध्ये लहान मुलांना विकण्याची टोळी सक्रिय असून, अडीच लाखात एका आठ महिन्यांच्या मुलीला विकण्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे.
पोलिसांचा यशस्वी सापळा
विरार पश्चिमेकडील एका ट्रस्टला या बाळाची विक्री करण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या नुसार पथक तयार करून सापळा रचला होता. चारही आरोपींना बाळ विकताना विरार पश्चिम परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे मजूर वर्गातील असून यात धक्कादायक बाब म्हणजे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या आई वडिलांनीच पोटच्या मुलीला पैश्याच्या हव्यासापोटी बाळ विकण्याचे ठरविले होते मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चौघांचा डाव फसला व त्यांना अटक करण्यात आली.