पालघर - रस्ता खोदल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नवघर येथे घडली. या घटनेत जखमी व्यक्तीचा कान कापल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सफाळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नवघर गावातील सूत्रांच्या माहितीनुसार, दत्तात्रेय पाटील हे १३ जुलै रोजी संध्याकाळी आपल्या शेतातील कामे उरकून घरी परतत होते. त्याचदरम्यान दत्तात्रेय पाटील यांचा जाण्याचा रस्ता शेजारी राहणारे आरोपी प्रभाकर एकनाथ म्हात्रे यांनी खोदून ठेवला. दत्तात्रेय पाटील हे याबाबत जाब विचारण्यासाठी म्हात्रे यांच्याकडे गेले असता, दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने आरोपी म्हात्रे याने कोयता घेऊन दत्तात्रेय यांच्या डोक्यावर व खांद्यावर वार करत जीवघेणा हल्ला केला. तसेच दुसरा आरोपी म्हात्रे यांचा मुलगा प्रीतम याने आपल्या जवळील कोंबडी कापण्याच्या सुऱ्याने दत्तात्रेय पाटील यांच्या उजव्या हातावर वार केले. तसेच डाव्या कानावर वार केला. यात जखमी झालेल्या दत्तात्रेय यांनी आपल्या मदतीसाठी आरडाओरड केल्याने शेजारी असलेल्या जखमी फिर्यादीचे भाऊ जगदीश पाटील यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी प्रीतमने जगदीश यांच्यावरही हल्ला करत पाठीवर सुऱ्याने वार करून दुखापत केली आहे.
रस्ता खोदल्याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा कापला कान; 2 जणांना अटक
रस्ता खोदल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना नवघर येथे घडली. या घटनेत जखमी व्यक्तीचा कान कापल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सफाळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
रस्ता खोदल्याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा कापला कान; 2 जणांना अटक
या याप्रकरणी सफाळे पोलिसांनी आरोपी प्रभाकर एकनाथ म्हात्रे व त्यांचा मुलगा प्रितम प्रभाकर म्हात्रे यांना अटक केली आहे. आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अंतर्गत भादंविसं कलम ३०७, ३२५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.