पालघर- अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आरोपींवर सफाळे पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ५१ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पिंकेश विश्वनाथ अरे असे या आरोपीचे नाव आहे.
५१ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त:-
पालघर तालुक्यातील सफाळे पुर्व भागातील दारशेत- उंबरपाडा नजीक असलेल्या मंगलडोहा रेतीबंदरात अवैध रेती उत्खनन करुन वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सकाळी पोलिसांनी मंगलडोहा रेतीबंदरात कारवाई केली असता, या ठिकाणी शासनाच्या परवानगीविना अवैधरीत्या रेती उत्खनन व रेती वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. सफाळे पोलिसांनी सदर ठिकाणाहून २ जेसीबी, २ हायवा ट्रक व ४ ब्रास रेती असा एकूण ५१ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एकाला अटक:-
रेतीची अवैध केल्याप्रकरणी पिंकेश विश्वनाथ तरे या आरोपीस सफाळे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात सफाळे पोलीस ठाण्यात भादविसं कलम ३७९, ३४ महाराष्ट्र जमीन महसूल कायदा सन १९६६ चे कलम ४८(७) प्रमाणे गुन्हा दाखल आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.