पालघर - पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील वसई रोड रेल्वे स्थानकात ( Vasai Railway Station ) धावत्या मेल-एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाली ( passenger collapsed on railway platform ) कोसळला. या प्रवाशाचे आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवानांनी प्राण वाचवले ( RPF Jawan Rescued Passenger ) आहेत. रेल्वे स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली.
अशी घडली घटना -
धावत्या ट्रेनमध्ये चढणे एका प्रवाश्याला जीवावर बेतले आहे. सई रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे ४ वाजून ४५ वाजताच्या दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रंमाक ३ वर बांसवाड़ा राजस्थानला जाणारी ट्रेन येताच प्रवासी ट्रेनमध्ये बसत असताना ही घटना घडली. परिणामी ट्रेनचा दरवाजाला अडकून फरफटत तो तरुण प्रवासी जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल रमेंद्र कुमार यांनी लगेच ट्रेनकडे धाव घेतली. या जवानाने ट्रेन खाली जात असलेल्या प्रवाश्याला सह प्रवाशांचा मदतीने मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्या प्रवाशांचे नाव वेजा हर्दू मैदा असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर आरपीएफ जवानी प्रथमोपचार दिला.