पालघर - मनोर येथील विठ्ठल मंदिरात पहाटे चार वाजताच्या सुमारास चोरीची घटना घडली. मंदिराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतून सुमारे दहा हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे.
मनोर येथील विठ्ठल मंदिरात चोरी; दानपेटीतून रोख रक्कम लंपास - विठ्ठल मंदिरात चोरी मनोर
मंदिराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप तोडून गाभाऱ्यात असलेली दानपेटी फोडली. दानपेटीत असलेली सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. शिवाय मुख्य दरवाज्याला असलेले पितळेचे कुलूपही चोरून नेले आहे.
हेही वाचा -विरारमध्ये धूम स्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या भामट्यांना अटक
मंदिराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप तोडून गाभाऱ्यात असलेली दानपेटी फोडली. दानपेटीत असलेली सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. शिवाय मुख्य दरवाज्याला असलेले पितळेचे कुलूपही चोरून नेले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिर मनोर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असताना चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.