महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ता खचला, वसईतील अनेक भागात रस्त्यावर पाणी - वाहतूक

मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. अजूनही रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे.

रस्ता दुरुस्तीचे काम करताना पोलीस मनपा कर्मचारी

By

Published : Jul 3, 2019, 4:20 PM IST

Updated : Jul 3, 2019, 5:21 PM IST

पालघर- पावसाचा जोर आता कमी झाला असला, तरी वसईतील अनेक भागात अजूनही साचलेले पाणी कमी झालेले नाही. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वसई वसंत नगरी ते एव्हरशाईन सिटी, वसई पंचवटी ते मुंबई अहमदाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.

खचलेला रस्ता


या खड्ड्याच्या ठिकाणी गटाराचे झाकण आहे. वसई-विरार महापालिकेचे सफाई कर्मचारी, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मार्गावरची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे.

Last Updated : Jul 3, 2019, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details