महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागले येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने रस्ता बंद, नागरिकांची गैरसोय - पालघर लेटेस्ट न्यूज

वसई पूर्वेतील कामण परिसरात असलेल्या नागले गावात जाण्यासाठीच्या भुयारी मार्गात मुसळधार झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे येथील येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

पाणी साचल्याने रस्ता बंद
पाणी साचल्याने रस्ता बंद

By

Published : May 18, 2021, 9:50 PM IST

पालघर -वसई पूर्वेतील कामण परिसरात असलेल्या नागले गावात जाण्यासाठीच्या भुयारी मार्गात मुसळधार झालेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे येथील येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने, नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

पाणी साचल्याने रस्ता बंद

कामण जवळील नागले गावात ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. पाणी साचल्याने रस्ता बंद झाला, त्यामुळे येथील नागरिक गावातच आडकून पडले आहेत. त्यांना गावाबाहेर पडता येत नाही. या गावामधूनच वसई दिवा रेल्वे वाहिनी गेलेली आहे. त्यासाठी या गावाच्या मध्यभागी रेल्वे प्रशासनाच्या वतीने फाटक बसविण्यात आले होते. पंरतु वारंवार फाटक बंद करावे लागत असल्याने नागरिकांचा तासनतास खोळंबा होत होता. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून, भुयारी मार्गाची निर्मिती केली. मागील वर्षी पासूनच हा मार्ग सुरु करण्यात आला आहे. मात्र मार्ग तयार करत असताना पाणी जाण्यासाठी जागा न ठेवल्याने पहिल्या पावसातच पाणी साचून नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे.

हेही वाचा -कुस्तीपटू सागर राणा हत्या प्रकरण: सुशील कुमारची याचिका न्यायालयाने फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details