पालघर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील अंबोली येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कष्टकरी संघटनेमार्फत विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी हा महामार्ग रोखून धरला असून यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर आंबोली येथे उड्डाणपूल करा, प्रत्येकाला रेशनिंग दिल गेलं पाहिजे, भरमसाठ वीज दरवाढ रद्द करा अशा विविध मागण्या करत रास्तारोको करण्यात आला आहे.
भारतीय कामगार संघटनेच्या (सीआयटीयू)कामगारांनी केंद्राच्या नवीन कामगार व कृषी कायद्यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. देशात विविध ठिकाणी रास्तारोको आणि तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षांनी जादवपूर येथे रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी - लेनिनिस्ट) लिबरेशन, माकप आणि कॉंग्रेस सदस्यांनी रेल्वे रोखली.
मोदी सरकारविरोधात कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन