महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय कामगार संघटनेच्या आंदोलनाला आरएमपीआयचा पाठिंबा; विविध मागण्यांसाठी रस्त्यावर - पालघर कामगार युनियन

विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. याला जनरल कामगार युनियन, ठाणे जिल्हा वाहतूक संघटना आणि वीट उत्पादक मजूर संघटना (लालबावटा) यांच्यातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासाठी अंबाडी येथे बुधवारी (8 जानेवारी)ला आंदोलन करण्यात आले.

labour-and-farmer agitation in palghar
केंद्रीय कामगार संघटनेच्या आंदोलनाला आरएमपीआयचा पाठिंबा; विविध मागण्यांसाठी रस्त्यावर

By

Published : Jan 9, 2020, 8:05 AM IST

Updated : Jan 9, 2020, 12:13 PM IST

पालघर - विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. याला जनरल कामगार युनियन, ठाणे जिल्हा वाहतूक संघटना आणि वीट उत्पादक मजूर संघटना (लालबावटा) यांच्यातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासाठी अंबाडी येथे बुधवारी (8 जानेवारी)ला आंदोलन करण्यात आले.

केंद्रीय कामगार संघटनेच्या आंदोलनाला आरएमपीआयचा पाठिंबा; विविध मागण्यांसाठी रस्त्यावर

रोजीरोटी अधिकार व सामाजिक सुरक्षा मिळण्याची प्रमुख मागणी यामार्फत करण्यात आली आहे. सरकारच्या अनेक धोरणांचाही निषेध नोंदवण्यात आला. तसेच बंद कारखाने सुरू करून बेरोजगारांना रोजगार देणे, युको झोनमधून आदिवासी शेतकरी प्लॉटधारकांच्या घरांसाठी जमिनीसाठी संरक्षण द्यावे, अशा प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या आहे.

हेही वाचा :पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथान आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच नागरिकत्व कायदा मागे घ्या, या मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यासाठी त्यांनी वाडा-भिवंडी महामार्गावरील अंबाडी येथे सकाळी अकराच्या दरम्यान आंदोलन पुकारले. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.

Last Updated : Jan 9, 2020, 12:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details