पालघर (वाडा) - राज्यात हवामान खात्याकडून दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरीवर्गाचा भात कापणी हंगाम अडचणीत आला आहे. कापणी केलेल्या भातपिकाची घराच्या अंगणात किंवा ओसरीवर सुरक्षितस्थळी साठवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे.
कापणी केलेल्या भातपिकाची घराच्या अंगणात किंवा ओसरीवर सुरक्षितस्थळी साठवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. हेही वाचा - पालघरमध्ये कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप, निवडणूक पथके रवाना
पालघर जिल्ह्यात भातकापणीला वेग आला आहे. यातच हवामान खात्याकडून देण्यात येणारा पावसाचा इशारा आणि पावसाचे वातावरण हे शेतकरीवर्गाला काळजीत टाकणारे आहे. भातपिक तयार झाले असल्याने भातपिकाची कापणी सुरू केली आहे. मुसळधार पावसाने हजेरी लावली तर हाती आलेले भातपिकाची नासाडी होईल, या भितीने सध्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यामूळे शेतकरीवर्ग भातशेती खळ्यावर व घराजवळ भाताच्या भाऱयांना ताडपत्रीने पावसापासून संरक्षण करित आहेत.
हेही वाचा - मतदान पथकासोबत रवाना होताना महिला पोलीस कर्माचाऱ्यांनी लुटला सेल्फीचा आनंद