पालघर - वाडा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली आहे. तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू नाही म्हणून शेतकरीवर्ग प्रतिक्षेत आहेत.
भात खरेदी केंद्र सुरू करा; पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कंचाड विभागात खानिवली, गोऱहे, पोशेरी, परळी, सोनाळे, खैरे या ठिकाणी भातखरेदी केंद्र आहेत. येथील शेतकरीवर्गाने भात झोडणी कामे सुरू केली आहेत. पिकवलेल्या भातपिकाला शासनदरबारी योग्य हमीभाव मिळावा, अडते आणि व्यापाराकडून भातखरेदीवर होणारी शेतकरीवर्गाची फसवणूक टाळता यावी, म्हणून शेतकरीवर्ग या भातखरेदी केंद्राकडे डोळे लावत असतो. मात्र, ही केंद्र अद्याप सुरू झाली नाहीत, अशी ओरड शेतकरीवर्गाने केली आहे.
हेही वाचा -कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बॅगमध्ये महिलेचे डोके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
अवकाळी पावसाने आणि अती पावसाने वाडा तालुक्यातील शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भातशेती नुकसानीबरोबर पेंढाही वाया गेला आहे, अशा परिस्थितीत व्यापारीवर्गही भात खरेदी करत नाही आहे. नुकसानग्रस्त शेतकरीवर्गावर अर्थिक संकट कोसळले असताना भातखरेदी केंद्रे सुरू केली तर त्यांना भात विकून अर्थिक निर्वाह करू शकतील, असे शेतीतज्ञ किरण पाटील असे सांगितले आहे.
नुकसानीचा सामना करून भातपिकाला अंगणात आणले, यातही अवकाळी पाऊस पिच्छा सोडत नव्हता. त्या परिस्थितीचा सामना करत भात झोडणी केली आहे. झोडणी केलेले भात साठवणूक केली आहे. मात्र, सोसायटी कर्जे आणि इतर कामासाठी भात विकून शेतकरीवर्ग गरज भागवत असतात. ही भातखरेदी केंद्रे सुरू नाही. भात भरण्यासाठी बारदान (पोती) खरेदी केंद्राकडे पोहचली नाही. तसेच काहींनी ही पोती पुरवली मात्र, त्यांचे कमीशन रखडले आहे. तर पोती पुरविण्याचे काम न केल्यामुळे त्यामुळे विलंब होत आहे, असेही सांगितले जात आहे.