महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला - वसई-विरार परतीचा पाऊस न्यूज

या पावसामुळे अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूककोंडी झाली होती. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती.

वसई-विरारमध्ये परतीचा पाऊस बरसला

By

Published : Nov 2, 2019, 2:22 AM IST

पालघर -गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज अचानक पुन्हा वसई-विरारमध्ये हजेरी लावली. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस

हेही वाचा -'शिवसेनेशिवाय भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी'

या पावसामुळे अनेक ठिकाणी रिक्षांची वाहतूककोंडी झाली होती. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह रायगड, कोकण भागात पावसाची दाट शक्यता वर्तवलेली होती. ठाणे, पालघर आणि रायगडच्या पट्ट्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा परतीचा पाऊस विलंबाने गेला. मात्र त्यानंतरही पाऊस राज्यात विविध ठिकाणी अधूनमधून हजेरी लावत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. दिवाळीदरम्यान अरबी समुद्रातील 'क्यार' चक्रीवादळाने थैमान घातले आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर वसईत पावसाने हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details