पालघर -जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून जिल्ह्यातील तीनही ग्रामपंचायतींवर तीन वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा विजय झाला आहे. तसेच सत्पाळा ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदिवासी एकता परिषद, निर्भय जन मंच पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सागावे ग्रामपंचायतवर शिवसेना भगवा-
सागावे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पूरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने 7 पैकी 4 जागांवर वर्चस्व मिळवित भगवा फडकवला. येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्यानंतर एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. नामनिर्देशन पत्र भरताना विरोधात एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने दिपाली दिनेश राव, संदेश रवींद्र खाटाळी आणि ममता मंगेश गायकवाड हे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. 15 जानेवारी 4 जागांसाठी शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनल आणि पक्षविरहित युवा परिवर्तन पॅनलच्या 8 उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर आज तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पार पडली. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी 2 उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य होते. आज झालेल्या मतमोजणीत 4 जागांपैकी 2 जागा जिंकून शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने सागावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्तावित केले आहे.
पाली ग्रामपंचायत बविआकडे -