पालघर - राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील जिल्ह्याचे पालकमंत्री पदही गेले होते. परिणामी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या महिन्याभरापासून रिक्त होते.
रवींद्र चव्हाण पालघरचे नवे पालकमंत्री - पालकमंत्री
रवींद्र चव्हाण यांची नाळ काही काळात पालघर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे.
रवींद्र चव्हाण यांची नाळ काही काळात पालघर जिल्ह्याशी चांगल्याप्रकारे जोडली गेली आहे. त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून काही काळच शिल्लक असला तरी या कालावधीत ते जिल्ह्याची बरीच विकासकामे मार्गी लावतील, येथील आदिवासी बहुल भागालाही ते पालकमंत्री म्हणून न्याय देतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
लोकसभा पोटनिवडणुक, पालघर नगरपरिषद निवडणूक तसेच अलीकडील लोकसभा निवडणूक व जिल्हा भाजपच्या विविध कार्यक्रमात चव्हाणांनी लक्ष घातले आहे. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली. जिल्ह्याच्या प्रभारी संपर्क पदाची जबाबदारीही चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे.