पालघर - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (three agricultural laws) मागे घेतले असून हे शेतकऱ्यांचं मोठं यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait) यांनी व्यक्त केलेय. राकेश टिकैत शुक्रवारी पालघर दौऱ्यावर (Rakesh Tikait on Palghar Tour) आहेत. बिरसा मुंडा यांच्या 147व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमीसेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी राकेश टिकैत यांची विशेष मुलाखत घेतली.
1) आज मोदी सरकारने तीन कृषी कायदे (Farm laws to be repealed)मागे घेतले आहेत. याबाबत तुमचे मत काय ?
आज संसदेत तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत एम.एस.पी.वर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील. यात शेतकऱ्यांचेच मोठे यश आहे.
2) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वाटते का ?