महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय वसईत व्हावे- खासदार राजेंद्र गावित. - पोलीस आयुक्तालय वसईत सुरु करण्याची मागणी

वसई विरारमधील गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्यालय वसई येथे असावे,असे मत खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले. पोलीस आयुक्त कार्यालयाबाबत मुख्यमंत्र्याकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्त पदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

rajendra gavit
राजेंद्र गावीत

By

Published : Sep 6, 2020, 5:25 PM IST

वसई(पालघर)-मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालय वसईमध्ये असावे, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाबाबतच्या जागेविषयी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे गावित यांनी सांगतिले.वसई विरार आणि मीरा भाईंदर या दोन महापालिका क्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्त कार्यालय सुरु करण्याची घोषमा 13 सप्टेंबर 2019 ला राज्य सरकारने केली होती.

राजेंद्र गावित, खासदार शिवसेना

वसई विरारमधील गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्यालय वसई येथे असावे, असे राजेंद्र गावित यांनी म्हटले. मुख्यमंत्र्याकडे याबाबत मागणी केली असून वसई मध्ये पोलीस आयुक्तलयाचे मुख्यालय होईल, अशी खात्री गावित यांनी व्यक्त केली. वसई विरारमध्ये मुख्यालयासाठी सध्या जागा नसली तर तात्पुरत्या स्वरुपात अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाचे स्थलांतर करता येईल त्या जागी पोलीस आयुक्तांचे कार्यालय सुरु करता येईल, असे गावित यांनी म्हटले.

हेही वाचा-'... त्याऐवजी कंगनानेच मुंबईबद्दलच्या विधानांसाठी माफी मागावी'

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी मीरा भाईंदरमधील महापालिकेच्या इमारतीत पोलीस आयुक्त कार्यालयाला पसंती दिली आहे. याबाबत विचारले असता गावित यांनी गुन्ह्यांचे प्रमाण पाहता वसईमध्ये मुख्यालय सुरु होण्याची गरज असल्याचे सांगतिले. याबाबत प्रयत्न सुरु राहतील असेही ते म्हणाले.

राज्य शासनाने 13 सप्टेंबर 2019 ला मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाबाबत घोषणा करण्यात आली होती. वसई विरार आणि मीरा भाईंदरची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी पाहता याठिकाणी नवे आयुक्तालय निर्माण व्हावे, या साठी अनेकवर्षापासून खासदार,आमदारांनी प्रयत्न सुरु केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details