पालघर - बुधवार सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यावेळी विजेच्या कडकडासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाड होत असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात येत होता.
पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ - farmer
पालघरमध्ये बुधवार सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. यावेळी विजेच्या कडकडासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा लंपडाव सुरु होता.
पालघर जिल्ह्यात बुधवार सायंकाळपासून विजेच्या कडकडासह पावसाने सुरूवात केली आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळत असुन अनेक ठिकाणी वीज गायब झाली आहे. या पावसाने सागर किनारपट्टी बरोबर ग्रामीण भागातील झोडपून काढले आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते अशातच कुठे सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली या दरम्यान, वीजेच्या कडकडात होत असल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात येत होता.अधून मधून विजेचे लोण आकाशात दिसत होते.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सध्या भाताचे पीक तयार होत आहे. अशा वेळी भात कापणीसाठी तयार झालेली पीकं भिजली कापता येत नाही. तसेच तयार होत असलेल्या भाताला उन्हाची गरज असल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर असल्याचे दिसत आहे.