पालघर - जिल्ह्यात सर्वत्र शुक्रवारपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे.
पालघरच्या मनोरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; दुकानांमध्ये शिरले गटारीचे पाणी - वीज पुरवठा
पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीत यावर्षी नालेसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात येथील बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. तसेच या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित होत आहे.
पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत हद्दीत यावर्षी नालेसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात येथील बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यालगतच्या गटारातील पाणी नागरिकांच्या घरात व दुकानांत शिरल्याने हे पाणी बाहेर काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागासह शहरी भागातही रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी - नाले ओसंडून वाहत आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित होत आहे.