पालघर -पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यांनी आज सकाळीच रेल रोको केला. मुंबईकडे जाणाऱ्या काही मेल एक्सप्रेसच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी पालघर रेल्वे स्थानकात तब्बल एक तास रेल रोको केला.
पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यांचा रेल रोको एक तास रेल रोको
पालघर डहाणूहून अनेक जण मुंबईत कामाला जातात. त्यांच्यासाठी लोकल आणि मेल एक्सप्रेस हेच प्रवासाचे साधन आहे. त्यात बदल झाल्यास त्याचा थेट फटका रेल्वे प्रवाशांना बसतो. तसेच काही आज ( बुधवारी ) घडले. सौराष्ट्र मेलची वेळ बदलण्यात आली. सकाळी ५.१० पालघरहून सुटणारी ही मेल एक्सप्रेस नव्या वेळे नुसार पहाटे २.४५ ला सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यात डहाणू चर्चगेट ही सकाळी सव्वा पाचला सुटणारी लोकलही उद्यापासून रद्द होणार आहे. याचा रागही प्रवशांना आला. त्यामुळे त्याचा निषेध करत प्रवाशी रेल्वे रूळावर उतरून रेल रोको केला.
पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यांचा रेल रोको सफाळे आणि केळवे रोड स्थानकातही रेल रोको
पालघर येथे रेल रोको होत असताना सफाळे स्थानकातही त्याचे प्रतिबिंब उमटले. या स्थानकात प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक रोखून धरली. स्थानकात असलेले राजधानी एक्सप्रेस प्रवाशांनी पुढे जावू दिली नाही. डहाणूकडे जाणाऱ्या लोकलही रोखून धरण्यात आल्या आहेत.
पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यांचा रेल रोको प्रवाशांकडून निवेदन
मेल एक्सप्रेसच्या वेळेत केलेला बदल आणि रद्द करण्यात आलेली लोकल याचा निषेध प्रवाशांनी व्यक्त केला आहे. हा निर्णय रेल्वे प्रशासनाने बदलावा असे निवेदन स्टेशन मास्टर यांना देण्यात आले आहे. हे निवेदन मुंबई सेंट्रलला पाठवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर संतप्त प्रवशांनी रोखून धरलेली रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली.
पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यांचा रेल रोको मध्य रेल्वेनेही केलेत बदल
मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. या गाड्या १ डिसेंबरपासून सुधारित वेळेत धावणार असून त्यांना काही थांबे देण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा बदल आहे. कोरोनामुळे काही गाड्यांच्या वेळात बदल झाल्याने अन्य गाड्यांचे पासिंग होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 12 विशेष प्रवासी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतारे यांनी दिली.
हेही वाचा -मध्य रेल्वे : 12 विशेष गाड्यांमध्ये बदल; 1 डिसेंबरपासून नवे वेळापत्रक लागू