पालघर - वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील नाना अपार्टमेंटजवळ गटाराचे पाणी तुंबल्याने येथील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करण्याबरोबरच गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. या समस्येप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी ग्रामपंचायत आणि वाडा तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे गेली चार ते पाच वर्षात न सुटलेली समस्या केव्हा सुटेल? असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.
हेही वाचा -दिल्लीतील गांधी आश्रम आजही केंद्र सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत...
वाडा तालुक्यातील कुडूस ही ग्रामपंचायत अर्थिकदृष्ट्या सक्षम मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तसेच सिमेंट काँक्रीटचे जंगलही येथे झपाट्याने वाढले आहे. तर येथील नाना अपार्टमेंट जवळच्या गटारीचे पाणी तुंबले आहे. यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गटारीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने गुडघाभर गटाराच्या पाण्यातून नागरिकांना येथून जावे लागते. पावसाळ्यात ही समस्या कायम राहते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ही समस्या कायम आहे.
हेही वाचा -'राजा हिंदुस्तानी' फेम कथ्थक गुरु वीरु कृष्णनन यांचे निधन