महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Palghar pregnant woman गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना बंद पडली जीप, खराब रस्ता असल्याने हाल - गर्भवती महिला

Palghar pregnant woman देशात अमृत महोत्सव साजरा होत असतांना मोखाड्यातील मर्कटवाडीची घटना समोर असताना वाडा तालुक्यातील पाचघर गावातील भयान वास्तव समोर आले आहे महिलेला प्रसूतीसाठी नेताना रस्त्यात जीप मातीत रुतल्यामुळे तरुणाची ही धडपड पाहून हेच आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य का असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो गावातील तरुणांनी मातीत रुतलेल्या जीपला धक्का मारत महिलेला रुग्णालयात पोहचविले आहे

Palghar pregnant woman
Palghar pregnant woman

By

Published : Aug 17, 2022, 1:29 PM IST

पालघर वाडादेशात अमृत महोत्सव साजरा होत असतांना मोखाड्यातील मर्कटवाडीची घटना समोर असताना वाडा तालुक्यातील पाचघर गावातील भयान वास्तव समोर आले आहे. महिलेला प्रसूतीसाठी नेताना रस्त्यात जीप मातीत रुतल्यामुळे तरुणाची ही धडपड पाहून हेच आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य का असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो. गावातील तरुणांनी मातीत रुतलेल्या जीपला धक्का मारत महिलेला रुग्णालयात पोहचविले आहे.

Palghar pregnant woman

दरम्यान वाडा तालुक्यात अनेक गावात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मग ७५ वर्ष अमृत महोत्सव साजरा होत असताना हाच का ७५ वर्षात झालेला विकास असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. वाड्यात गर्भवती महिलेस तरुणांनी मातीत रुतलेल्या जीपला धक्का मारत रुग्णालयात पोहचविले आहे.

हेही वाचा -Aaditya Thackeray कपटी कारस्थानामुळेच सरकार कोसळले, आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details