महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?' - Vasai-Virar Assembly Constituency

बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता घरा-घरात आहे. त्यामुळे आम्हाला प्रचार करताना फार मेहनत घ्यावी लागत नाही, असे प्रविणा ठाकूर यांनी सांगितले.

प्रविणा ठाकूर, माजी महापौर

By

Published : Oct 18, 2019, 8:49 AM IST

पालघर- जो उमेदवार गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करतो, तो विकासकामे काय करणार? तुम्ही निवडणूक लढवायला आलात की गोळ्या झाडायला? असा सवाल विचारत माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी नालासोपारा विधानसभेचे युतीचे उमेदवार प्रदिप शर्मा यांच्यावर तोफ डागली.

प्रविणा ठाकूर, माजी महापौर

पुढे बोलताना म्हणाले, बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता घरा-घरात आहे. त्यामुळे आम्हाला प्रचार करताना फार मेहनत घ्यावी लागत नाही. गेल्या 30 वर्षांत झालेली कामे लोकांनी पाहिली आहेत. त्यामुळे यावेळी ही कामेच फक्त मतदारांपुढे मांडायची आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - संतोष जनाठे म्हणजे बहुजन विकास आघाडीने सोडलेले मांजर; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

वसई-विरारमध्ये दोन्ही विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी पक्षाचे आमदार आहेत. यामध्ये हितेंद्र ठाकूर हे गेली 30 वर्षे तर क्षितीज ठाकूर हे 10 वर्षे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या विकासकांच्या जोरावर ते विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - वसईत फळविक्रेत्याकडून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूसे हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details