महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याचे माहिती नाही' - शिवाजी महाराज जयभगवान गोयल

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व भाजपचे प्रविण दरेकर यांची 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकावर अजब प्रतिक्रिया.

pravin darekar on controversial book of shivaji maharaj
प्रविण दरेकर

By

Published : Jan 14, 2020, 11:30 AM IST

पालघर -'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली की नाही हे मला माहिती नसून, हे पुस्तक मी वाचलं नसल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व भाजपचे प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. याबाबत आमचे वरिष्ठ नेते योग्य भूमिका मांडतील, असेही दरेकर म्हणाले.

'नरेंद्र मोंदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याचे माहिती नाही'

हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिला नाही; मात्र, असलेला निधी पळवून नेला'

'सध्या लोकांचे जीव जात असून, कुणी राजीनामा देवो किंवा न देवो यापेक्षा आज लोकांना काय हवं आहे? याचा जास्त विचार केला पाहिजे.' असे दरेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. सरकारने आपसात भांडण्यापेक्षा जनतेचे प्रश्‍न सोडवावे महाराष्ट्रात जास्त गंभीर समस्या सध्या उभ्या आहेत त्यावर योग्य तो तोडगा काढावा, असे मत यशवंतराव गडाख यांच्या 'काँग्रेस-राष्ट्रवादी नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील' या वक्तव्यावर दरेकर यांनी मत व्यक्त केले.

हेही वाचा - गातेगावच्या शेतकऱ्यांची व्यथा : 'ध' चा 'म' झाला अन् योजनेपासून बळीराजा वंचित राहिला

ABOUT THE AUTHOR

...view details