महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले अपयश झाकते - प्रवीण दरेकर - Pravin Darekar criticizes Mahavikas Aghadi

राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते व आपले अपयश झाकून ठेवते, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Pravin Darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Jun 1, 2021, 7:19 PM IST

Updated : Jun 1, 2021, 8:15 PM IST

पालघर - महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते व आपले अपयश झाकून ठेवते, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. गिरणोली येथे घराला आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या पाटील कुटुंबीयांना यावेळी 25 हजारांचा धनादेश व जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वरूपात भाजपतर्फे देण्यात आली. यावेळी दरेकर यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी व आमदार मनीषा चौधरी देखील उपस्थित होत्या.

माहिती देताना प्रवीण दरेकर

हेही वाचा -पुणे जिल्ह्यातील यवत गावच्या हद्दीतील प्रसिद्ध कांचन हॉटेलला लागली आग

पालघर तालुक्यातील गिरणोली येथे शॉर्टसर्किटमुळे पाटील कुटुंबीयांचे घर जळून खाक झाले होते. या नुकसानग्रस्त कुटुंबाची प्रवीण दरेकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घराचे नुकसान शॉर्टसर्किटने झाल्याने ती नुकसान भरपाई महावितरण देणार असल्याचे तालुका प्रशासनामार्फत सांगण्यात आले असले तरीही पंचनामे फक्त नावापुरतीच होत असून एकमेकांवर खापर फोडून हे प्रशासन हात वर करत असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी थेट संपर्क साधून पाटील कुटुंबीयांना तात्काळ मदत द्यावी अशी विनंती त्यांनी महावितरणला केली आहे. नुकसान भरपाई संदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या आहेत.

हेही वाचा -म्युकरमायकोसिसवर उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय रुई येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना

Last Updated : Jun 1, 2021, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details