महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक दुर्घटना : प्रवीण दरेकरांची दुर्घटनास्थळाला भेट, जखमींची केली विचारपूस - तारा नायट्रेट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी तारापूर औद्योगिक वसाहतीतील (ए.एन.के.फार्मा) तारा नायट्रेट या दुर्घटनास्थळी येऊन पाहणी केली. यानंतर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची दुर्घटनास्थळी भेट
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची दुर्घटनास्थळी भेट

By

Published : Jan 13, 2020, 6:04 PM IST

पालघर - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (सोमवार) तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन दुर्घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनास्थळी भेट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी तारापूर औद्योगिक वसाहतीतील (ए.एन.के.फार्मा) तारा नायट्रेट या दुर्घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच तुंगा रुग्णालयात जाऊनदुर्घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. घडलेला प्रकार हा अत्यंत धक्कादायक असून अनधिकृतपणे ही कंपनी सुरू असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख न देता १० लाख रुपये सरकारने मदत करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

हेही वाचा -तारापूर औद्योगिक दुर्घटना: एनडीआरएफच्या 35 कर्मचाऱ्यांचे 14 तास बचावकार्य

दरम्यान, शनिवारी ७ च्या सुमारास तारापूर औद्योगिक वसाहतीतील (एएनके फार्मा) तारा नायट्रेट या कंपनीत चाचणी दरम्यान झालेल्या स्फोटात या ८ जणांचा मृत्यू, तर ७ जण जखमी झाले होते.

हेही वाचा - तारापूर औद्योगिक दुर्घटनेत दोन कामगार महिलांचा मृत्यू तर चिमुकल्या जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details