पालघर- जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हा फाटा ते गोऱ्हे गावापर्यंत या चार किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. वारंवार या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही, अशी खंत जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
पालघरच्या गोऱ्हे फाट्यावरील रस्त्याची झाली चाळण - रस्त्याची झाली चाळण
गोऱ्हा फाटा ते गोऱ्हे गावापर्यंत या चार किलोमीटर अंतरावरील रस्त्याची चाळण झाली आहे. रस्ते लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जोराचा पाऊस आला की येथील रस्ता नाल्याच्या पाण्यात बुडतो. यामुळे हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने अपघाताची भीती प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. गोऱ्हे फाटा ते गोऱ्हे गावं हा रस्ता मनोर-वाडा-भिवंडी या मुख्य मार्गाला जोडणारा आहे. या रस्त्याला पंचक्रोशीतील 15 ते 20 गावे जोडलेले आहेत. या परिसरात कारखाने, शाळा, महाविद्यालय असल्याने कामगारांसह विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात कमरे एवढ्या पाण्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.