पालघर (वाडा) - वाडा शहरात वाहनधारकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे संथगतीने वाहतूक सुरू असते तर कधी येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाडा ते परळी नाका रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
वाडा शहरातील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक कोंडी समस्या ऐरणीवर
वाडा शहरातील खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या मुख्यरस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचारीवर्गालाही खड्डे सावरून येथून जावे लागते.
वाडा शहरातील खंडेश्र्वरी नाका ते परळी नाका या मुख्यरस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचारीवर्गालाही खड्डे सावरून येथून जावे लागते. पावसाने भरलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला वाट काढणे बिकट जाते. अशातच एखादे भरधाव वाहन चिखल उडविण्याची भीती पादचारीवर्गाला सतावत असते.
खड्ड्यांमुळे येथे एखाद्या वाहनाचा बिघाड होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे येथे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावर वाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रभारी उपअभियंता चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले.