पालघर - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूच्या संसर्गाची जोखीम लक्षात घेऊनच महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र बोईसर परिसरात पाहायला मिळत आहे. विनाकारण गाडीवर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावल्या आहेत.
बोईसर येथे विनाकारण मोटारसायकलवर फिरणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा
लॉकडाऊन असतानाहीदेखील काही अतिउत्साही नागरिक विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरताना दिसत आहेत. अशाच विनाकारण फिरणाऱ्यांना बोईसर पोलिसांनी रस्त्यावरच ४० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.
बोईसर येथे विनाकारण मोटारसायकलवर फिरणाऱ्यांना पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा
लॉकडाऊन असतानाहीदेखील काही अतिउत्साही नागरिक विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरताना दिसत आहेत. अशाच विनाकारण फिरणाऱ्यांना बोईसर पोलिसांनी रस्त्यावरच ४० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. तर, काहींना लाठीचा प्रसाद मिळाला. विनाकारण रस्त्यांवर फिरत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असूूून वाहनेदेखील जप्त करण्यात येत आहेत.