डहाणुत जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांचा छापा, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य व पैसे असा 2 लाख 76 हजार 354 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर -डहाणू येथे मटका जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून 2 लाख 76 हजार 354 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आठ आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाळे गावठणपाडा येथील एका वाडीत मोकळ्या जागेत काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता गोपाळ वसंत मेहर (वय 43), राजेश पंढरी दुबळा (वय 38), शशिकांत पालिया माच्छी (वय 35), अशोक कमला यादव (वय 37), यासिन इस्माईल नमाजी (वय 52), जुबेर चांदअली खान (वय 53), हनिफ मेनन ( वय 60), चंद्रकांत कल्याणजी शाह (वय 62) हे आठ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य व पैसे असा 2 लाख 76 हजार 354 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.