नालासोपारा (पालघर)- गव्हाच्या टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला बुधवारी रात्री तुळींज पोलिसांनी पकडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. गंगाराम गामा सिंग (42) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गव्हाच्या टेम्पोमधून नालासोपारा पूर्वेकडून गुटख्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो (क्रमांक एमएच 48 बीएम 4549) हा यशवंत एम्पायर समोरील मोकळ्या मैदानात उभा असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये गव्हाच्या 15 गोण्या आणि 5 कुरमुऱ्याच्या 5 गोण्या होत्या. मात्र, त्याच्यामागे गुटख्याच्या गोण्या पोलिसांना सापडल्या. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, तर एकाला पोलिसांनी टेम्पोमधून ताब्यात घेतले. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून 3 लाखांचा विमल पान मसाला (70 गोणी), 15 हजारांचे रजनीगंधा (अडीचशे ), 38 हजार 720 रुपयांचे विमल तंबाखू (8 गोणी), 22 हजार 500 रुपयांचे एमपी कंपनीचा गहू (15 पोती ), 2 हजार 500 रुपयांचे कुरमुरे (5 पोते), 30 हजार रुपये रोख आणि 5 लाखांचा टेम्पो जप्त केला आहे.
गव्हाच्या टेम्पोतून लाखोंचा गुटखा जप्त; नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई - पालघर ताज्या बातम्या
गव्हाच्या टेम्पोमधून गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो पोलिसांच्या निर्दशनास आला. त्या टेम्पोमधून पोलिसांनी लाखोंचा गुटखा जप्त केला आहे.
गव्हाच्या टेंपोमधून लाखोंचा गुटखा जप्त; नालासोपारा येथील घटना