नालासोपारा(पालघर) - ई-पासचा घोटाळा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे बिनदिक्कतपणे ई-पासचा काळाबाजार करत होते. झेरॉक्सच्या दुकानात कसलीही भीती न बाळगता त्यांचा व्यवसाय सुरु होता.ऐरवी ई-पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो. मात्र, हे महाशय केवळ 15 मिनिटात ई-पास मिळवून देत होते आणि त्यासाठी 1500 रुपये घेत होते.
1500 रुपयात कुणालाही 15 मिनिटात ते पास मिळवून देत होते. पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि अतिश गडा दोघांच्या मुसक्या आवळल्यात. हे दोघे किती दिवसापासून ई- पास काढून देत होते आणि त्यांनी कुणाकुणाला पास दिलाय याचा तपास पोलीस करत असून तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व दत्तात्रय पाटील यांनी लोकांना आवाहन केले आहे की असे पाससाठी कोणाकडून पैसे उकळले गेले असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी.