मुंबई - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry car crash) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. तो रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या रस्त्यांवर बदल करण्यात आले आहे. पालघरमधील पोलिसांनी हे बदल केले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली आहे.
सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या रस्त्याची दुरुस्ती; सुरक्षेच्या दृष्टीने केले बदल - पालघर पोलीस
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry car crash) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. तो रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
![सायरस मिस्त्री यांचा अपघात झालेल्या रस्त्याची दुरुस्ती; सुरक्षेच्या दृष्टीने केले बदल Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17130483-thumbnail-3x2-accident.jpg)
पोलिसांनी दिली माहिती - वाहनचालक आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी चारोटे पुलावर बदल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. या महामार्गावर चार वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध असतील, जेणेकरून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात जलदगतीने पोहोचवता येईल. याशिवाय, आम्ही तीन लेनच्या भागाचे रूपांतर दोन लेनमध्ये केले आहे. तसेच वेग मर्यादेबद्दल बोर्ड लावले आहेत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
4 सप्टेंबर रोजी चारोटे पुलाच्या रेलिंगला कार आदळल्याने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला होता.