महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हक्काग्रह धरणे आंदोलन; श्रमजीवी संघटनेच्या ३१ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - shramjivi union protesters news

श्रमजीवी संघटनेमार्फत जिल्ह्यातील विविध तहसिलदार कार्यालयासमोर मंगळवारपासून हक्काग्रह धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, आज डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील 31 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Police arrested shramjivi union protesters
श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : May 27, 2020, 5:55 PM IST

पालघर -वंचित गरिबांना रेशनकार्ड आणि धान्य, इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी डहाणू येथे हक्काग्रह धरणे आंदोलन करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या ३१ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारपासून हे कार्यकर्ते डहाणू तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते.

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात वंचित गरिबांना रेशनकार्ड आणि धान्य, इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुनावणीत राज्य सरकारने हमीपत्र देऊन या मागण्या मान्य केल्या. मात्र, प्रत्यक्षात त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याने श्रमजीवी संघटनेमार्फत जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवारपासून हक्काग्रह धरणे आंदोलन सुरू केले. मात्र, आज डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील 31 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

लॉकडाऊन, संचारबंदी आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडितही स्वतः ला अटक करवून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details