डहाणूत जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; चौघांविरोधात गुन्हे दाखल
डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पालघर - डहाणू येथे जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून 70 हजार 984 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 4 आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता धनेश जयचंद चव्हाण (वय 58), निलेश रामजी माच्छी (वय 37), संतोष लक्ष्मण माच्छी (वय 44), संजय अशोक गुप्ता (वय 42) हे चार जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे सामान व पैसे असा 70 हजार 984 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.