पालघर -पोलिसांनी पालघर पूर्व परिसरात जुगार खेळणाऱ्या १० आरोपींवर कारवाई करत ७३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर पूर्व येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त - palghar gambling news
पालघर पूर्वेकडील आंबेडकर नगर परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आंबेडकर नगर परिसरात पालघर पोलिसांनी कारवाई केली असता, एका घरातील मागच्या खोलीमध्ये टेबल व खुर्च्या मांडून पैसे लावून जुगार खेळताना १० आरोपी आढळून आले.
पालघर पूर्वेकडील आंबेडकर नगर परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आंबेडकर नगर परिसरात पालघर पोलिसांनी कारवाई केली असता, एका घरातील मागच्या खोलीमध्ये टेबल व खुर्च्या मांडून पैसे लावून 'रमी' जुगार खेळताना १० आरोपी आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपींकडून ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १० आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.