पालघर - मीरा रोड येथे डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्यामुळे किराणा घेण्यास एकाने नकार दिला आहे. यानंतर या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. गजानन चतुर्वेदी (वय - 51) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोडच्या जया पार्क येथील रहिवासी गजानन चतुर्वेदीची यांच्या पत्नीने मंगळवारी सकाळी फोन करून किराणा सामान मागवले. हे सामान घेऊन एक डिलिव्हरी बॉय नियमांप्रमाणे सोसायटीच्या बाहेर राहून हे सामान त्यांना देऊ लागला. मात्र, यावेळी गजानन चतुर्वेदीने किराणा सामान घेऊन आलेल्या मुलाचे नाव विचारले. त्यावर आपले नाव बरकत उस्मान पटेल आहे, असे सांगितले. मुलाने आपले नाव सांगताच, मी मुसलमानांच्या हातून काहीच घेत नाही, असे सांगत चतुर्वेदीने किराणा सामान घेण्यास नकार दिला.