विरार (पालघर) - वसई-विरारमध्ये रिसॉर्टमध्ये बारबालांचा छमछम नाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरार पोलीस ठाणे हद्दीतील मांडवी परिसरातील चांदीप येथील मॉस या रिसॉर्ट-बारवर गुरुवारी (5 ऑगस्ट) रात्री बारबालांचा छम-छम डान्स सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिसाॅर्टवर छापा टाकला. यावेळी बारबालांचा छमछम नाच होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी 15 ग्राहकांवर कारवाई केली. शिवाय त्यांना अटकही करण्यात आली.