पालघर- नालासोपारा येथे एका नराधम बापानेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्याला काळिमा.. नालासोपाऱ्यात जन्मदात्या बापाचा ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार - जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार
नालासोपारा येथे एका नराधम बापानेच ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा; भाजपचा शिवसेनेला टोला
नालासोपारा पूर्वेकडील श्रीराम नगर येथे एका नराधम बापाने त्याच्या ७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात केली आहे. तक्रारदार या आपल्या पतीसोबत राहत असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी ही ७ वर्षाची आहे. पत्नी वसईला कामाला जाते व पती हा रिक्षा चालक आहे. पत्नी कामाला गेल्यावर नराधम त्याच्या छोट्या मुलीला व मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून तो ७ वर्षाच्या मुलीला घरात घेवून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्या नराधम बापाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद हे करत आहेत.