महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मास्क न वापरणाऱ्यांसह कोरोनाचे नियम, अटी न पाळणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - पालघर जिल्हाधिकारी कार्यालय न्यूज

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक तसेच कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृह, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे उद्यान बाजारपेठा रेस्टॉरंट शाळा-महाविद्यालयात नाट्यगृह अशा ठिकाणांची वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पालघरमध्ये कारवाई
कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पालघरमध्ये कारवाई

By

Published : Feb 20, 2021, 5:35 PM IST

पालघर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक तसेच कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. कोरोना विषयीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणांची वेळोवेळी करण्यात येणार पाहणी

मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृह, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे उद्यान बाजारपेठा रेस्टॉरंट शाळा-महाविद्यालयात नाट्यगृह अशा ठिकाणांची वेळोवेळी पाहणी करण्यात येणार आहे.

कोरोना नियम व अटींचे पालन न केल्यास होणार कारवाई

कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे असे निर्देश पालघर जिल्हा प्रशासनाने दिले असून नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा मास्क न वापरल्यास २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांच्यात समन्वयाने एकत्रितरीत्या ही कारवाई करण्याचे आदेश पालघर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details