पालघर (वाडा)- तालुक्यात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी १ जून (शनिवारी) रोजी मोर्चा काढण्यात आला. डेमॉक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे कॉम्रेड सुनिल धानवा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि शेतकरी उपस्थित होते.
विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाचा वाडा तहसील कार्यालयावर ठिय्या - tahasil wada
वाडा तालुक्यातील विविध समस्यांवर आवाज उठवत कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
वाडा तालुक्यातील विविध समस्यांवर आवाज उठवत कम्युनिस्ट पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. पाणी टंचाई सोडवा, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड देऊन ते ऑनलाईन करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, वनपट्टे नावावर करणे, विद्युत मंडळाची कामे पावसाळ्यापुर्वी करावीत, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात घोषणा देत तहसीलदार आवारात दोन तास ठिय्या आंदोलन केले.
यावर संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून बहुतांशी मागण्या पूर्ण करून घेतल्याची माहिती कॉम्रेड सुनिल धानवा यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली. वाडा शहरातील परळी या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध केली जाईल. वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे जागेची अडचण सोडवून तेथेही शौचालय सुविधा पुरविण्यात येईल व याबाबत वाडा तहसीलदार कार्यालयाकडून माहीती दिली जाणार असल्याचे धानवा यांनी सांगितले.