पालघर - बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा भांडवलदारासाठी आहे, गरीबांसाठी नाही असा आरोप करत पडघे येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संयुक्त मोजणीसाठी आलेल्या महसूल आणि अधिकाऱ्यांना परत पाठवले.
बुलेट ट्रेन प्रकल्प भांडवलदारांसाठीच; पडघेकरांनी संयुक्त मोजणी अधिकाऱ्यांना धाडले माघारी - padaghe
बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून मोठा पोलीस फौजफाटा घेऊन बुलेट ट्रेनच्या संयुक्त मोजणीसाठी अधिकाऱ्यांनी मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत ही संयुक्त मोजणी हाणून पडली व अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.

पालघर तालुक्यातील पडघे येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संयुक्त मोजणी करण्यासाठी महसूल अधिकारी आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. हा प्रकल्प आणि याचा विकास हा फक्त श्रीमंतांसाठी, भांडवलदारांसाठी आहे, गरीबांसाठी नाही, असे म्हणत विरोध करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना माघारी परतविले.