पालघर- मुली वाचावा मुली जगवा, हरित वसई ग्रीन वसई, झाडे लावा झाडे जगवा, असे विविध सामाजिक संदेश देत विरारमध्ये रविवारी सकाळी एकता दौडमध्ये आबालवृद्ध धावले. पहाटेपासून संपन्न झालेल्या या स्पर्धेत हजारो धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला.
विरारमध्ये धावले विरारकर; १६ वी एकता दौड मोठ्या उत्साहात संपन्न - palghar
स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश जावा, सर्वांनाच आरोग्याचे महत्व कळावे यासाठी गेल्या १६ वर्षांपासून ही स्पर्धा भरवत असल्याचे वसई विरार महापालिका स्थायी समितीचे सभापती व विद्यमान नगरसेवक प्रशांत राऊत यांनी सांगितले.

एकता दौडचे यंदा १६ वे वर्ष होते. विवा गिरीविहार उत्सव समिती व बहुजन विकास आघाडीतर्फे विरार पूर्व येथे ‘एकता दौड’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ६ वर्षांपासून ते अगदी ७० वर्षांपर्यंतच्या धावपटूंनी ५ किलोमीटर पर्यंतच्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. यामध्ये महिला व पुरुषांसाठी विविध वयोगटातील १२ गट होते यात त्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश जावा, सर्वांनाच आरोग्याचे महत्व कळावे यासाठी गेल्या १६ वर्षांपासून ही स्पर्धा भरवत असल्याचे वसई विरार महापालिका स्थायी समितीचे सभापती व विद्यमान नगरसेवक प्रशांत राऊत यांनी सांगितले. स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर पुढे जात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, असे ब.वि.आ.चे नगरसेवक अजीव पाटील म्हणाले. तर, अशा स्पर्धा वारंवार झाल्या पाहिजे, अशी इच्छा स्पर्धकांनी व्यक्त केली.
हेही वाचा-पालघरमध्ये साडेनऊ लाखांची वीजचोरी, महावितरण भरारी पथकाची कारवाई