महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्गरम्य जव्हार घनकचऱ्याच्या कचाट्यात, दुर्गंधीमुळे जनता त्रस्त

जव्हार शहराच्या भागातच घनकचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच दुर्गंधीयुक्त घन कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा वावर येथे वाढला आहे. हा घनकचरा हटविण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

palghar
जव्हार शहर घनकचऱ्याच्या कचाट्यात

By

Published : Dec 9, 2019, 8:55 PM IST

पालघर - जिल्ह्यातील जव्हार शहराच्या जव्हार- नाशिक रोडवर घन कचरामुळे प्रवासीवर्ग आणि जनतेला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. निसर्गरम्य ठिकाणाच्या जवळच दुर्गंधी पसरत असल्याने हा घनकचरा हटविण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

जव्हार शहर घनकचऱ्याच्या कचाट्यात

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावर वसलले जव्हार हे पूर्वी शहर संस्थान होते. आता या शहरात नगरपरिषद आहे. या संस्थानला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे. या ऐतिहासिक घडामोडीबरोबरच पर्यटनासाठी हवे असलेल्या निसर्गाचे कोंदन या शहराला लाभले आहे. सनसेट पॉईंट, जुना राजवाडा अशी प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत. असे असताना इथल्या निसर्गरम्य शुध्द हवेचा श्वास घनकचऱ्याच्या दुर्गंधीने नाहीसा होताना दिसत आहे. या शहराच्या भागातच हा घनकचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त घन कचऱ्यामुळे डासांची पैदास वाढली असून भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा वावर येथे वाढला आहे.

हेही वाचा - भात खरेदी केंद्र सुरू करा; पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

जव्हार आणि नाशिक या मार्गांवर ये-जा करणारी वाहने, बसेस या ठिकाणहून जात असतात. घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते तेव्हा या आगीत धुराचे लोन पसरतात. ज्यामुळे वाहनांना मार्ग कठीण बनत असते आणि अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे हा घनकचरा येथून हटविण्यात यावा या मागणीला जोर पकडत आहे.

हेही वाचा -वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा मोहित राठोडने जिंकली

ABOUT THE AUTHOR

...view details