पालघर - देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब आणि गरजूंना जेवण मिळावे यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. आज पालघर पंचायत समितीसमोर ही थाळी घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लावलेली पाहायला मिळाली.
पालघरमध्ये शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा - महाराष्ट्र कोरोना अपडेट
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंसाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली आहे. आज पालघर पंचायत समितीसमोर शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. रांगेत उभ्या असलेल्या अनेकांनी चेहऱ्याला मास्क देखील लावलेले नव्हते.
![पालघरमध्ये शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा palghar latest news shivbhojan thali maharashtra government shivbhojan thali maharashtra corona update महाराष्ट्र कोरोना अपडेट राज्य सरकार शिवभोजन थाळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6897628-541-6897628-1587558304688.jpg)
पालघरमध्ये शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा