पालघर- नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २४ मार्चला मतदान होत आहे. यासाठी यासाठी विविध राजकीय पक्षांमार्फत प्रचाराची रणधुमाळी सध्या शहरभर सुरू आहे. यावेळी शिवसेनेसाठी प्रचार करत असताना प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मोहपाडा प्रभागात शिंदेंना तेथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत.
नगरसेवकाच्या नाकर्तेपणाचा एकनाथ शिंदेंना नागरिकांनी विचारला जाब - corporator
प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांना आपल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मोहपाडा प्रभागात शिंदेंना तेथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत.
आधी आपल्या नगरसेवकांची कामे दाखवा, नंतर आमच्यासमोर मत मागायला या, असे या परिसरातील महिलांनी व नागरिकांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले. आधीच बंडखोरीचा सामना करत असलेल्या शिवसेनेनेच्या चिंतेत नागरिकांच्या रोषामुळे अधिकच भर पडली आहे.
या निवडणुकीत अपक्ष बंडखोर शिवसैनिक नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत असल्याने अधिकृत शिवसेना व भाजप महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक पालघरमध्ये ठाण मांडून आहेत.