पालघर -दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, वसई-विरार शहरात बाजारपेठाही सजल्या आहेत. परंतु, यावर्षी करोनाचे संकट असल्याने बाजारात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी आहे. त्यामुळे, व्यावसायिक वर्ग चिंतेत सापडला आहे.
वसई-विरार शहरात विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारे आकाश दिवे, विविध आकाराच्या पणत्या, रांगोळी, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. दरवर्षी गजबजलेल्या बाजारपेठेत यंदा ग्राहकांची गर्दी कमी आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच ग्राहक बाजारात आकाश दिवे, फराळ साहित्य, रांगोळी, कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात. परंतु, यंदा अवघ्या चार ते पाच दिवसांवर दिवाळी आहे. तरीही बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमीच आहे. अनेक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी आणला आहे. त्यामुळे, माल खरेदीसाठी जितके पैसे टाकलेत किमान तितके तरी पैसे मिळावे, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
कमी खरेदीला कोरोना कारणीभूत