पालघर -वाडा तालुक्यातील मेट येथील पेल टेक हेल्थ केअर या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 5 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे.
वाडा येथे पेल टेक हेल्थ केअर कंपनीत स्लॅब कोसळला, 2 कामगारांचा जागीच मृत्यू दोन कामगारांचा जागीच मृत्यू
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मेट येथील पेल टेक हेल्थ केअर या औष बनवणाऱ्या कंपनीतील एका शेडमध्ये बांधकाम करण्याचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. कमल मंगल खंदारे (वय ५० वर्षे) आणि लाल (वय 24 वर्षे) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिला व पुरूषाचे नाव आहे.
5 जखमींना कल्याणी रुग्णालयात दाखल
ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणी 15 कामगार काम करत होते. या घटनेत 5 कामगार जखमी झाले आहेत. ब्रिजेश पटेल, राकेश कुमार, विजय सिंग, गोरख कुमार व अनिल कुमार अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. जखमींवर खुपरी येथील कल्याणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.