पालघर -मुंबई सेंट्रल येथून सुरतकडे जाणाऱ्या फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये सर्वसामान्य डब्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपीला संतापलेल्या रेल्वे प्रवाशांनी जबरदस्त चोप दीला. यानंतर त्याला पालघर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याला प्रवाशांनी चोपले - दारू
मुंबई सेंट्रल येथून सुरतकडे जाणाऱ्या फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये सर्वसामान्य डब्यात सर्वेंन गोर नामक व्यक्ती मद्यपान करून चढला होता. तो सीटवर बूट ठेवून बसला. आजूबाजूच्या प्रवाशांनी त्याला पाय खाली घेण्यास सांगितले असता त्याने प्रवाशांना शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. यानंतर प्रवाशांनी त्याला बदडले.
मुंबई सेंट्रल येथून सुरतकडे जाणाऱ्या फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये सर्वसामान्य डब्यात सर्वेंन गोर नामक व्यक्ती मद्यपान करून चढला होता. तो सीटवर बूट ठेवून बसला. आजूबाजूच्या प्रवाशांनी त्याला पाय खाली घेण्यास सांगितले असता त्याने प्रवाशांना शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून डब्यात बसलेल्या प्रवाशांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला जबरदस्त चोप दिला. यानंतर त्याला पालघर रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.