पालघर /नालासोपारा - नालासोपारा पूर्वकडील तुळींज रोड येथील हरी निवास इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हरी निवास ही इमारत धोकादायक झाल्याने ती रिकामी करण्यात आली होती. सध्या त्या इमारतीत कोणीही राहत नव्हते. मात्र, आताल पावसामुळे ती कमकुवत झाल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील काही भाग कोसळला असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.
नालासोपारा पूर्वेकडील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला - हरी निवास इमारत दुर्घटना नालासोपारा
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड येथील हरी निवास इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
![नालासोपारा पूर्वेकडील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला Building Accident Walinj Road Nalasopara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8065916-thumbnail-3x2-aa.jpg)
इमारत दुर्घटना वाळींज रोड नालासोपारा
नालासोपारा पूर्वेकडील हरी निवास या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला..
हेही वाचा -भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९वर
वसई-विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. इमारतीचा धोकादायक भाग काढून टाकण्याचे काम सुरू आहे. तर इमारत यापूर्वीच पालिकेने खाली केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.